योजनगंधा सोसायटीची रिडेव्हलपमेंट करणाऱ्या लोटस लॅंडमार्कस् च्या श्री गिरींचा अनोखा अनुभव

मी Redevelopment वर ब्लॉग लिहायला सुरुवात केली आहे. 

कोथरूड बद्दल लिहित असल्याने मराठीत लिहतो आहे. 

तरीही ब्लॉग चे नाव इंग्रजीत आहे - Ravi Karandeekar on Redevelopment of Housing Societies in Kothrud, Pune 

पहिला ब्लॉग माझ्या शेजारच्या योजनगंधा सोसायटी बद्दल लिहला आहे https://bit.ly/3TxT1Rn

विषय आणि भाषा - दोन्ही नवीन असूनही मी ब्लॉग बरा लिहिला आहे. 

जमलं तर वाचून जरूर सुधारणा सुचवा‌‌. 

असं हे वरचं पोस्ट मी माझ्या WhatsApp Channel वर टाकलं. 

तेच पोस्ट - मी ज्या बिल्डर बद्दल लिहिलं होतं त्यांनाही - श्री सत्य प्रभा गिरी यांनाही - पाठवलं होतं.

माझ्या ब्लॉग मध्ये - https://bit.ly/3TxT1Rn - बिल्डर बद्दल - श्री गिरींच्या बद्दल - मतं मागवली होती. 

त्यांच्या Lotus Landmarks - llipl.com - या कंपनीच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी - आर्थिक व्यवहारातील सचोटी - सेवेचा दर्जा - या बद्दल त्यांच्याकडे ज्यांनी फ्लॅट घेतलेले आहेत - त्यांना त्यांचे अनुभव शेयर करण्याची जाहीर विनंती केली होती.

बिल्डर आणि त्याच्या कामाबद्दल मते आणि माहिती - Review & Feedback - जमा करण्याचा उपद्व्याप - पुण्यातील कुठल्याही बिल्डरला - आजिबात आवडत नाही - असा अनुभव गेली १५ - २० वर्षे मला सातत्याने आला आहे. 

पण Lotus Landmarks च्या श्री. गिरींचा अनुभव फार वेगळा आला. त्यांनी माझ्या या उपद्व्यापाचे स्वागत केले. 

ग्राहकांच्या Views - Opinions - Reviews - Feedback वरून मला खूप काही शिकायला मिळेल आणि सुधारणा करता येतील - असे ते म्हणाले! 

खरं नाही वाटत नां? म्हणून मी त्यांचा पूर्ण WhatsApp Message इथं जसाच्या तसा copy paste केला आहे - तो वाचा - म्हणजे पुण्यात असाही बिल्डर आहे या वर तुमचा विश्वास बसेल. 

Good Afternoon Sir,
It’s very well written. And I am absolutely no authority to suggest correction. 😊
Looking forward to the reaction of readers to the blog. I am very keen to what people think about me, it will be an eye opener. Will work on any negative feedback and will also work to further all positive feedback. 
Thanks

आहे नां कमाल? 

तर, निःसंकोचपणे श्री गिरी आणि Lotus Landmarks बद्दल तुमचे views - reviews - experiences - opinions - suggestions - काॅमेंटस् मध्ये लिहा - मला 9860044110 फोन करून सांगा किंवा याच नंबरवर WhatsApp Message करा. 

आपला
रवी करंदीकर
9860044110


Yojangandha CHS, Shivtirth Nagar, Paud Road, Kothrud - GR65+7M Pune, Maharashtra

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योजनगंधा सोसायटी लोटस लॅंडमार्कस् कोथरूड पुणे - मनाचे श्लोक ते महेश मांजरेकर

बिल्डरांच्या चांडाळ चौकडीला मान द्या