योजनगंधा सोसायटी लोटस लॅंडमार्कस् कोथरूड पुणे - मनाचे श्लोक ते महेश मांजरेकर

माझ्या सुमेधा Society च्या शेजारच्या योजनगंधा सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पाचं launching १७ डिसेंबर २०२३ ला झाले. 

MahaRera Registration Number
P52100053370  

Launching नट, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते श्री महेश वामन मांजरेकर यांच्या हस्ते झाले. 

R J Bandya ने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले आणि श्री मांजरेकरांची मुलाखत घेतली. 

गायन वादन, चविष्ट जेवण, शेकडो Society Members ची उपस्थिती, Architect - RCC Consultant वगैरेंचा सत्कार - असा भव्यदिव्य सोहळा छान रंगला. 

योजनगंधा आणि माझ्या सुमेधा मध्ये common compound wall आहे त्यामुळे माझ्या Co-Operative Housing Society च्या सर्व Members ना समारंभाचे निमंत्रण होतं.
 
माझ्या सकट बहुतेक सगळे Society Members गेलेही होते.

महेश मांजरेकर येणार होते म्हणून नाही.

शेजारधर्म निभावण्यासाठी नाही. 

बिल्डरने - श्री सत्य प्रभा गिरी यांनी - स्वतः फोन करून आग्रहाचे निमंत्रण दिले होते म्हणून नाही‌.

तर योजनगंधा बरोबर सुमेधाची - आमच्या सोसायटीची - एकत्र Redevelopment केली तर तुमचा खूप जास्त फायदा होईल अशी offer बिल्डरने - श्री गिरी यांनी - आम्हाला दिली होती म्हणून! 

या समारंभाला उपस्थित राहिल्या नंतर माझ्या Society च्या Members नी कदाचित Offer बद्दल जास्त गंभीरपणे विचार केलाही असेल - पण मी काही केला नाही. 

घरी आल्यावर - माझ्या मनात माझ्या Society ला मिळालेल्या आकर्षक Redevelopment Offer बद्दल अजिबात विचार आला नाही. 

उलट माझ्या मनात योजनगंधाच्या Redevelopment बद्दल विचार आले. 

योजनगंधा मधल्या एकाही Society Members शी माझी मैत्री वगैरे कधीही नव्हती. तरी शेजारी म्हणून मला ते सगळे लोक आवडायचे. 

बोलणं चालणं - येणं जाणं - काहीही नसलं तरी त्यांच्या बरोबर गेल्या ३० एक वर्षात माझं - एक तर्फी - भावनिक नातं जुळले आहे.

Redevelopment बद्दल Offer दिल्यामुळे झालेल्या 
एक दोन भेटीत त्यांच्या बिल्डर बद्दल - श्री गिरींच्या बद्दल - माझं बरं मत झालेलं आहे .

या दोन्ही गोष्टींमुळे Launching चा कार्यक्रम संपवून घरी आल्यावर मी माझ्या बायकोला म्हटलं - स्थळ चांगलं मिळालं - कार्य सुरळीत पार पडलं - दोघांचा संसार सुखाचा झाला म्हणजे भरून पावलो! 

तू तर वधू-पित्या-सारखा बोललास - बायको म्हणाली. 

माझी तशीच काहीशी अवस्था झाली आहे - मी कबूल केलं. 

का? - बायकोनं विचारलं. 

आठवतं नां? Redevelopment करायला दिल्याची Announcement करणाऱ्या पहिल्या Hoarding वर फक्त मनाचा श्र्लोक लिहिलेला होता. आणि आज Launching ला महेश मांजरेकर! - मी म्हटलं.

अरे हो रे! रामदास स्वामी आणि बिग बाॅस चा ॲंकर - दोन्हींचा भक्त!! Wow! What a multidimensional person!! - बायको म्हणाली.

व्यक्तिमत्वाचे कंगोरे लक्षात घेता - अगदी प्रेमात पडून जरी लग्न केलं असलं - तरी संसार सुखाचा होईल नां? - असं पोटच्या मुला-मुली बद्दलच - नाही तर नात्यातल्या कुणा बद्दलही - वाटतंच की! - मी म्हटलं. 

योजनगंधाची Redevelopment नीट पार पाड रे देवा - जय श्रीराम! - असं म्हणून बायकोने हात जोडले. 

हसत मी तिला विचारले - आपले योजनगंधावाले सुध्दा अशीच प्रार्थना करत असतील का? 

तुम्हाला काय वाटतं? 

Lotus Landmarks - llipl.com -
च्या श्री सत्य प्रभा गिरींना तुम्ही ओळखता का?

 त्यांच्या construction quality - service - financial transactions - बद्दल तुम्हाला काही माहिती - अनुभव आहे का? 

जर असेल तर 9860044110 वर फोन करून मला जरूर सांगा ही आग्रहाची विनंती. 

आपला,
रवी करंदीकर
9860044110




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बिल्डरांच्या चांडाळ चौकडीला मान द्या

योजनगंधा सोसायटीची रिडेव्हलपमेंट करणाऱ्या लोटस लॅंडमार्कस् च्या श्री गिरींचा अनोखा अनुभव