बिल्डरांच्या चांडाळ चौकडीला मान द्या
कुछ तो गडबड है, दया! - हे पोस्ट टाकल्या टाकल्या एक फोन आला. “हे तुम्हाला कोणी सांगितलं ते मला माहितेय. करणं ते माझ्या सोसायटीत घडलंय” - फोन करणारा म्हणाला. “मी अभिमानाने सांगतो की - मीच तो अरेरावी करणारा भ्रष्ट चेअरमन आहे. तो खोटारडा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट माझा साथीदार आहे,” - अशी त्या फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख करून दिली. “छान! मग आता त्या बिल्डरचेही नांव सांगून टाका आणि त्याच्या बरोबर तुमचं काय साटंलोटं आहे तेही सांगा,” - मी विनंती केली. “आमची नांव तुम्ही लिहिलं तरी आम्हाला काहीच problem नाहीये! पण जरा society members चा विचार करा - त्यांच्या भोळ्या भाबड्या कोवळ्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतील,” - चेअरमन म्हणाले. “का त्यांना शंका नाहीये?,” - मी विचारले. “शंका? त्यांना खात्री आहे! ते बोलत नाहीत - कारण ते practical आहेत. PMC - Project Management Consultant - सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी - आणि बिल्डर यांची भ्रष्ट युती - corrupt nexus असतो - ही आज - आम बात - सर्रास गोष्ट आहे - हे त्यांना माहीत आहे - त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही - हे त्यांनी आ...