पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

योजनगंधा सोसायटीची रिडेव्हलपमेंट करणाऱ्या लोटस लॅंडमार्कस् च्या श्री गिरींचा अनोखा अनुभव

इमेज
मी Redevelopment वर ब्लॉग लिहायला सुरुवात केली आहे.  कोथरूड बद्दल लिहित असल्याने मराठीत लिहतो आहे.  तरीही ब्लॉग चे नाव इंग्रजीत आहे - Ravi Karandeekar on Redevelopment of Housing Societies in Kothrud, Pune  पहिला ब्लॉग माझ्या शेजारच्या योजनगंधा सोसायटी बद्दल लिहला आहे https://bit.ly/3TxT1Rn विषय आणि भाषा - दोन्ही नवीन असूनही मी ब्लॉग बरा लिहिला आहे.  जमलं तर वाचून जरूर सुधारणा सुचवा‌‌.  असं हे वरचं पोस्ट मी माझ्या WhatsApp Channel वर टाकलं.  तेच पोस्ट - मी ज्या बिल्डर बद्दल लिहिलं होतं त्यांनाही - श्री सत्य प्रभा गिरी यांनाही - पाठवलं होतं. माझ्या ब्लॉग मध्ये - https://bit.ly/3TxT1Rn - बिल्डर बद्दल - श्री गिरींच्या बद्दल - मतं मागवली होती.  त्यांच्या Lotus Landmarks - llipl.com - या कंपनीच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी - आर्थिक व्यवहारातील सचोटी - सेवेचा दर्जा - या बद्दल त्यांच्याकडे ज्यांनी फ्लॅट घेतलेले आहेत - त्यांना त्यांचे अनुभव शेयर करण्याची जाहीर विनंती केली होती. बिल्डर आणि त्याच्या कामाबद्दल मते आणि माहिती - Review & Feedback - जमा करण्या...

योजनगंधा सोसायटी लोटस लॅंडमार्कस् कोथरूड पुणे - मनाचे श्लोक ते महेश मांजरेकर

इमेज
माझ्या सुमेधा Society च्या शेजारच्या योजनगंधा सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पाचं launching १७ डिसेंबर २०२३ ला झाले.  MahaRera Registration Number P52100053370   Launching नट, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते श्री महेश वामन मांजरेकर यांच्या हस्ते झाले.  R J Bandya ने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले आणि श्री मांजरेकरांची मुलाखत घेतली.  गायन वादन, चविष्ट जेवण, शेकडो Society Members ची उपस्थिती, Architect - RCC Consultant वगैरेंचा सत्कार - असा भव्यदिव्य सोहळा छान रंगला.  योजनगंधा आणि माझ्या सुमेधा मध्ये common compound wall आहे त्यामुळे माझ्या Co-Operative Housing Society च्या सर्व Members ना समारंभाचे निमंत्रण होतं.   माझ्या सकट बहुतेक सगळे Society Members गेलेही होते. महेश मांजरेकर येणार होते म्हणून नाही. शेजारधर्म निभावण्यासाठी नाही.  बिल्डरने - श्री सत्य प्रभा गिरी यांनी - स्वतः फोन करून आग्रहाचे निमंत्रण दिले होते म्हणून नाही‌. तर योजनगंधा बरोबर सुमेधाची - आमच्या सोसायटीची - एकत्र Redevelopment केली तर तुमचा खूप जास्त फायदा होईल अशी off...